भजनी मालिका

भजने

मायेवरी सत्ता आवडीची बाळा । संकोचोनि लळा प्रतिपाळी ॥१॥ अपराध माझे न मनावे मनीं । तुम्ही संतजनीं मायबापीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मायेविण बाळ क्षणभरि न राहे । न देखता होय कासाविस ॥१॥ आणिक उदंड बुझाविती तरी । छंद त्या अंतरीं माउलीचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मायेसी रुसलें भावासी त्यागिलें । जाऊनि राहिलें काकापासीं ॥१॥ काकी मुख दावा काकी मुख दावा । काकी मुख दावा बाईयांनो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मारग ते बहु बहुत प्रकार । प्रणव विचार जयापरी ॥१॥ आदि अंतु नाहीं मार्गाची ग्वाही । साधनें लवलाहीं वायां पंथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मारगीं चालतां पाउलापाउलीं । चिंतावी माउली पांडुरंग ॥१॥ सर्व सुख लागे घेउनिया पाठी । आवडींचा कंठीं रस ओती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मारावया राजे ब्राह्मणाचे घरीं । रेणुकाजठरीं अव-तार ॥१॥ करूनियां पृथ्वी नि: क्षत्रिय बहुवेळं । दान ते सकळां विप्रां दिली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मारिले असुर वाढल्या मेदिनी । होते कोणाकोणी पीडित ते ॥१॥ तया नारायण पाठवी अघोरा । संतांच्या मत्सरा घातावरी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

मारिले ते वीर माव करि करी । मृषा ते वैखरी केली जगीं ॥१॥ पण केला होता न धरीं शस्त्रासी । भीष्म तो तयासी स्मरणवंत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मारी गावढी चुकलीसे भाई । देखन देखन त्रिभुवनसे आई । उन शोधन लागछे भाई । अब कैसी गत करुछे आई ॥१॥ मथुरा लमानीना मारो नामछे । गावढी देखत आई गांवछे । दृष्टी देखन नहीं मानछे । कैसें भुलाय कन्हयानछे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मारूं नये सर्प संतांचिये दृष्टी । होतील ते कष्टी व्यापकपणें ॥१॥ एक सूत्र जीवशिवीं आइक्यता । रोम उपडितां अंग कांपे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मार्ग चुकले विदेशी एकले । तयावरी झाले दिशाभुली ॥१॥ हातीं धरुनियां पावविलें घरा । त्याच्या उपकारा काय द्यावें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम