भजनी मालिका
← भजनांकडे परत

मार्ग चुकले विदेशी एकले । तयावरी झाले दिशाभुली

marga chukale videshi ekale | tayavari jhale dishabhuli

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मार्ग चुकले विदेशी एकले । तयावरी झाले दिशाभुली ॥१॥ हातीं धरुनियां पावविलें घरा । त्याच्या उपकारा काय द्यावें ॥२॥ तैसा मी कुडकुडा होतों केशीराजा । सेवा न घडे लाजा म्हणऊनि ॥ध्रु.॥ सांडियेला गर्भ उबगोनि माउली । नाहीं सांभाळिली भूमि शुध्द ॥३॥ उष्ण तहान भूक एवढे आकांतीं । वोसंगा लाविती काय म्हणु ॥४॥ खांद्यावरी शूळ मरणाचे वाटे । अन्यायहि मोठे साच केले ॥५॥ हातींचा हिरोनि घातला पाठीसी । तुका म्हणे ऐसी परी आली ॥६॥