भजनी मालिका

भजने

आतां पुढे बाळचरित्र । कृष्णक्रिडा अति विचित्र । ऐकवां श्रवणी होती पवित्र । गातां वक्र शुचिभूंत ॥१॥ एक अजर एक अक्षर हे भगवत्कथा । श्रवणीं पडतांचि अवचिता । कैवल्यपदप्राप्तीची योग्यता । पावे श्रोता वक्ता तात्काळ ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आतां भय नाहीं ऐसें वाटे जीवा । घडलिया सेवा समर्थाची ॥१॥ आतां माझ्या मनें धरावा निर्धार । चिंतनीं अंतर न पडावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां मज धरवावी शुद्धी । येथुनी परतवावी बुद्धी । घ्यावें सोडवुनि कृपानिधि । सांपडलों संधीं काळचक्रीं ॥१॥ करिसील तरि नव्हे काई । राईचा डोंगर पर्वत राई । आपुले करुणेची खाई। करीं वो आई मजवरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां मागतों तें ऐके नारायणा । भावपूर्वक मनापासूनियां॥१॥ असों दे मोकळी जिव्हा जरि गाइल गुण । नाहीं तरी खिळुन टाकीं परती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां माझा नेणों परतों भाव । विसावोनि पायीं ठेविला जीव । सकळां लाभांचा हा ठाव । ऐसा वाव झाला चित्ताठायीं ॥१॥ भांडवल गांठी तरि विश्वास । झालों तों झालों निश्चय दास । न पाहें मागील ते वास । पुढती सोस सेवेचा ची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां माझा सर्व निवेदिला भाव । धरोनी एक ठाव राहिलोंसे ॥१॥ जेथें काळाचाहि न पुरे हात । तयाचे पायीं चित्त समर्पिलें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा