भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां पुरे हा संसार । कोठें फेडूं उपकार

atan pure ha sansar | kothen phedun upakar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आतां पुरे हा संसार । कोठें फेडूं उपकार ॥१॥ सांडूनियां थोरपण । करी दळण कांडण ॥२॥ नारिरूप होउनी हरी । माझें न्हणें धुणें करी ॥३॥ राना जाये वेंची शेणी । शेखीं वाहे घरीं पाणी ॥४॥ ठाव मागें पायापाशीं । म्हणे नामयाची दासी ॥५॥