भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां मज देवा । इचे हातींचें सोडवा

atan maj deva | iche hatinchen sodava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां मज देवा । इचे हातींचें सोडवा ॥१॥ पाठी लागलीसे लांसी । इच्छा जिते जैसी तैसी ॥ध्रु.॥ फेडा आतां पांग। अंगीं लपवुनी अंग ॥२॥ दुजें नेणें तुका । कांहीं तुह्मासी ठाउका॥३॥