भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां मागतों तें ऐके नारायणा । भावपूर्वक मनापासूनियां

atan magaton ten aike narayana | bhavapurvak manapasuniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां मागतों तें ऐके नारायणा । भावपूर्वक मनापासूनियां॥१॥ असों दे मोकळी जिव्हा जरि गाइल गुण । नाहीं तरी खिळुन टाकीं परती ॥ध्रु.॥ मातेचिया परी देखती परनारी । ठेवीं नेत्र तरी नाहीं तरि नको ॥२॥ तरी बरें कांटाळा करिती निंदास्तुतीचा । नाहीं तरि कानांचा ही देख प्रेत्न ॥३॥ सकळ इंद्रियांचा निग्रह करूनि एक । राखवीं पृथक तोडोनि भ्रम ॥४॥ तुकयाबंधु म्हणे ते चि वाट प्राणां । पडता नारायणा विसर तुझा॥५॥