माझ्या ठेवी दाखवीं लवलाही । बांधीन मी पायीं जीव तुझ्या
majhya thevi dakhavin lavalahi | bandhin mi payin jiv tujhya
माझ्या ठेवी दाखवीं लवलाही । बांधीन मी पायीं जीव तुझ्या ॥१॥ सिद्धच ठेवणें नामयानें ठेविलें । त्यासी कां लाविलें आडवें हें ॥२॥
majhya thevi dakhavin lavalahi | bandhin mi payin jiv tujhya
माझ्या ठेवी दाखवीं लवलाही । बांधीन मी पायीं जीव तुझ्या ॥१॥ सिद्धच ठेवणें नामयानें ठेविलें । त्यासी कां लाविलें आडवें हें ॥२॥
majhya to manen kelase vichar | anik prakar nenen kanhi
माझ्या तो मनें केलासे विचार । आणिक प्रकार नेणें कांही ॥१॥ नाम वेळोवेळां आठवावे वाचे । दुजें आणिकांचें भय नाहीं ॥२॥
majhya dehachen dehapan | nagavita narayan
माझ्या देहाचें देहपण । नागविता नारायण ॥१॥ माझें मीपणा पाडिलें वोस । वायां कां मज ठेविला दोष ॥२॥
majhya bapen maj didhalen bhatuken | mhanoni kavatuken krida karin
माझ्या बापें मज दिधलें भातुकें । म्हणोनि कवतुकें क्रीडा करीं ॥१॥ केली आळी पुढें बोलिलों वचन । उत्तम हें गुण आलें त्याचें ॥ध्रु.॥
majhya bovadiya bola | chitta dyaven va viththala
माझ्या बोवडिया बोला । चित्त द्यावें वा विठ्ठला ॥१॥ वारा जाय भलत्या ठायां । तैसी माझी रागछाया ॥२॥
majhya bhaven keli jodi | cha sarechi kalpa kodi
माझ्या भावें केली जोडी । च सरेची कल्प कोडी । आणियेलें धाडी । घालूनि अवघें वैकुंठ ॥१॥
majhya mana tun karin pan vichar | nam nirantar nivrutti japen
माझ्या मना तूं करीं पां विचार । नाम निरंतर निवृत्ति जपें ॥१॥ जपतां नामावळी आळस न करीं । कोटि जन्म फ़ेरी चुके तेणें ॥२॥
majhya mana tun dhari kan vichar | na kari prakar an kanhin
माझ्या मना तूं धरी कां विचार । न करी प्रकार आन कांहीं ॥१॥ पंढरीसी कोणी जाती वारकरी । सुखें त्यांचे घरी पशुयाती ॥२॥
majhya mana dharin godi | sant jodi kari tun
माझ्या मना धरीं गोडी । संत जोडी करी तूं ॥१॥ मग सुखा काय उणें । देवचि ठाणें दुणावें ॥२॥
majhya mana lago chala | pahavaya viththala dolan
माझ्या मना लागो चाळा । पहावया विठ्ठला डोळां ॥१॥ आणीक नाही चाड । न लगे संसार हा गोड ॥ध्रु.॥
majhya mana lago chhand | nitya govind govind
माझ्या मना लागो छंद । नित्य गोविंद गोविंद ॥१॥ तेणें देह ब्रह्मारुप । निरसेल नामरुप ॥२॥
majhya mana lago chhand | nitya govind govind
माझ्या मना लागो छंद । नित्य गोविंद गोविंद ॥१॥ तेणें निरसेल बंधन । मुखीं वदे नारायण ॥२॥
majhya manacha sandeh | phitala dekhatanchi pay
माझ्या मनाचा संदेह । फिटला देखतांचि पाय ॥१॥ तुम्हीं कृपा केली संतीं । निरसली भय खंती ॥२॥
majhya manachen ten man | charanin thevaven bandhun
माझ्या मनाचें तें मन । चरणीं ठेवावें बांधून ॥१॥ मग तें जाऊं न शके कोठें । राहे तुमच्या नेहटें ॥२॥
majhya manen tujhya charanin dili budi | indriyen bapudi vedavalin
माझ्या मनें तुझ्या चरणीं दिली बुडी । इंद्रियें बापुडी वेडावलीं ॥१॥ आतां विषयसुख जागावें हें कोणें । जाणोनी भो-गणें कोणें स्वामी ॥२॥
majhya mukhavata nayo hen vachan | vhaven santan dravya konan
माझ्या मुखावाटा नयो हें वचन । व्हावें संतान द्रव्य कोणां ॥१॥ फुकाचा विभाग पतनदुःखासी । दोहींमुळें त्यासी तें चि साधे ॥ध्रु.॥
majhya mukhen maj bolavito hari | sakalan antarin narayan
माझ्या मुखें मज बोलवितो हरी । सकळां अंतरीं नारायण ॥१॥ न करावा द्वेष भूतांचा मत्सर । हा तंव विचार जाणों आम्ही ॥२॥
majhya vadilanchi mirasi ga deva | tujhi charanaseva panduranga
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ॥१॥ उपवास पारणी राखिला दारवंटा केला । भोगवाटा आम्हालागी॥ध्रु.॥
majhya vithobacha kaisa premabhav | apan chi dev hoy guru
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपण चि देव होय गुरू ॥१॥ पढियें देहभावें पुरवि वासना । अतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ध्रु.॥
mandavachya dara pudhen | anila mhatara
मांडवाच्या दारा पुढें । आणिला म्हातारा ॥१॥ म्हणे नवरी आणा रांड । जाळा नवर्याचें तोंड ॥ध्रु.॥