भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझ्या मुखावाटा नयो हें वचन । व्हावें संतान द्रव्य कोणां

majhya mukhavata nayo hen vachan | vhaven santan dravya konan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझ्या मुखावाटा नयो हें वचन । व्हावें संतान द्रव्य कोणां ॥१॥ फुकाचा विभाग पतनदुःखासी । दोहींमुळें त्यासी तें चि साधे ॥ध्रु.॥ नाइकावी निंदा स्तुति माझ्या कानें । सादर या मनें होऊनियां ॥२॥ तुका म्हणे देव असाध्य यामुळें । आशामोहजाळें गुंतलिया ॥३॥