भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझ्या मना लागो चाळा । पहावया विठ्ठला डोळां

majhya mana lago chala | pahavaya viththala dolan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझ्या मना लागो चाळा । पहावया विठ्ठला डोळां ॥१॥ आणीक नाही चाड । न लगे संसार हा गोड ॥ध्रु.॥ तरि च फळ जन्मा आलों । सरता पांडुरंगीं जालों ॥२॥ तुका म्हणे देवा । देई चरणांची सेवा ॥३॥