भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझ्या मना लागो छंद । नित्य गोविंद गोविंद

majhya mana lago chhand | nitya govind govind

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझ्या मना लागो छंद । नित्य गोविंद गोविंद ॥१॥ तेणें देह ब्रह्मारुप । निरसेल नामरुप ॥२॥ तुटेल सकळ उपाधी । निरसेल आधिव्याधी ॥३॥ गोविंद हा जनीं वनीं । म्हणें एका जनार्दनीं ॥४॥