भजनी मालिका

भजने

आतां चुकलें बंधन गेलें विसरोनि दान । आपुले ते वाण सावकाश विकावे ॥१॥ लाभ जोडला अनंत घरीं सांपडलें वित्त । हातोहातीं थीत उरों तळ नल्हाचि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां जागा रे भाई जागा रे । चोर निजल्या नाडूनि भागा रे ॥१॥ कैसें असोनि ठाउकें नेणां । दुःख पावाल पुढिले पेणा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां जावें वेगीं नामया घेऊनि । सांगावीं आवंतणी ब्राह्मणांसी ॥१॥ सकळकामपूर्ण असती तुमच्या पायीं । विचारावें कांहीं न लगे देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥ सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां तरी बालका आणी । आपल्या करें मी लेववीन लेणीं । यशोदा म्हणे मांडिली हाणी । निवांत पोरटें नसेची ॥१॥ मग जाऊनियां पालखाजवळी । म्हणे मृत्यु पाचारिंतो तूंते वनमाळी । उगाचि असतासि जरि ये कळीं । तरि वांचतासी काय करुं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आतां तरी मज सांगा साच भावे । काय म्यां करावें ऐसें देवा ॥१॥ चुकालिया वर्म नोहे ते कारण । केला होय सीण अवघा चि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां तरी विचार करी । ध्यायीं अंतरीं विठठला ॥१॥ नाहीं तरी व्यर्थचि जासी । पुढें चौर्‍यांयसीं भोगावया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आतां तुज कळेल तें करीं । तारिसी तरि तारीं मारीं । जवळी अथवा दुरी धरीं । घाली संसारीं अथवा नको ॥१॥ शरण आलों नेणतपणें । भाव आणि भक्ती कांहीं च नेणें । मतिमंद सर्वज्ञानें । बहु रंक उणें रंकाहुनी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां तुझा भाव कळों आला देवा । ठकूनियां सेवा घेसी माझी ॥१॥ टाकूनि सांकडें आपुलिये माथां । घातला या संतावरी भार ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां तुझें नाम गात असें गीतीं । म्हणोनी मानिती लोक मज ॥१॥ अन्नवस्त्रचिंता नाहीं या पोटाची । वारिली देहाची थोर पीडा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम