भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां देवा मोकलीलें । तुम्ही भलें दिसेना

atan deva mokalilen | tumhi bhalen disena

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां देवा मोकलीलें । तुम्ही भलें दिसेना ॥१॥ आतां नाहीं जीवभाव । उरला ठाव वेगळा ॥ध्रु.॥ सांभाळुन घ्यावें देवा । आपणासवा यावरी ॥२॥ तुका म्हणे नग्न भाज । तरि ते लाज स्वामीसी ॥३॥