भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां चक्रधरा । झणी आह्मांस अव्हेरा

atan chakradhara | jhani ahmans avhera

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां चक्रधरा । झणी आह्मांस अव्हेरा ॥१॥ तुमचीं ह्मणविल्यावरी । जैसीं तैसीं तरी हरी ॥ध्रु.॥ काळ आह्मां खाय । तरी तुझें नांव जाय ॥२॥ तुका ह्मणे देवा । आतां पण सिद्धी न्यावा ॥३॥