भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां चुकलें बंधन गेलें विसरोनि दान । आपुले ते वाण सावकाश विकावे

atan chukalen bandhan gelen visaroni dan | apule te van savakash vikave

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां चुकलें बंधन गेलें विसरोनि दान । आपुले ते वाण सावकाश विकावे ॥१॥ लाभ जोडला अनंत घरीं सांपडलें वित्त । हातोहातीं थीत उरों तळ नल्हाचि ॥ध्रु.॥ होतें गोविलें विसारें माप जालें एकसरें । होतें होरें वारें तों चि लाहो साधिला ॥२॥ कराया जतन तुका म्हणे निजधन । केला नारायण साह्य नेदी विसंबों ॥३॥