भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां जागा रे भाई जागा रे । चोर निजल्या नाडूनि भागा रे

atan jaga re bhai jaga re | chor nijalya naduni bhaga re

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां जागा रे भाई जागा रे । चोर निजल्या नाडूनि भागा रे ॥१॥ कैसें असोनि ठाउकें नेणां । दुःख पावाल पुढिले पेणा ॥ध्रु.॥ आतां नका रे भाई नका रे । आहे गांठीं तें लुटवूं लोकां रे ॥२॥ तुका म्हणे एकांच्या घायें । कां रे जाणोनि न धरा भये ॥३॥