भजनी मालिका

भजने

बारा हात लुगडें एकचि नारी । पालऊं घातला खांदियावरी ॥१॥ जाईन त्या गोकुळा पाहीन त्या गोपाळा । तयालागीं उतावेळ मन माझें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बाराही सोळा गडियांचा मेळा । सतरावा बसवंत खेळिया रे । जतिस पद राखों जेणें टिपरिया घाई । अनुहातें वायें मांदळा रे ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

बाल वृद्ध तरुण काया हे जर्जर । वेगीं हा पामर आळशी झाला ॥१॥ काय करूं देवा नाहीं यासि भावो । न करी हा उपावो तुझ्या भजनीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बाळ काय जाणे जीवनउपाय । वाहे मायबाप सर्व चिंता ॥१॥ आइतें भोजन खेळणें अंतरीं । अंकिताचे शिरीं भार नाहीं ॥ध्रु॥ आपुलें शरीर रिक्षतां न कळें । सांभाळूनि लळे पाळी माय ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

बाळ कृष्ण रांगे नंदाघरीं । चोरी करी घरोघरीं गौळणी धरूनिया करीं । घेऊन नंदमंदिरा आली ॥१॥ गार्‍हाणे सांगती अबला नवलविंदान तयाची ती कळा । हांसत उभा यशोदे जवळा पाहूनियां बाळा चाकाटली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बाळ तरुण वृद्ध ऐसे ते पाहिले । पाहुनी निमाले देखसी रया ॥१॥ प्रपंच काबाड कोंबड्याचे परी । पुढेंचि उकरी लाभ नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बाळ माते निष्ठुर होय । परि तें स्नेह करीत आहे ॥१॥ तैसा तूं गा पुरुषोत्तमा । घडी न विसंबसी आम्हां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बाळ मातेपाशीं सांगे तानभूक । उपायाचें दुःख काय जाणे ॥१॥ तयापरी करीं पाळण हें माझें । घेउनियां ओझें सकळ भार ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बाळ रांगणें रांगतु । दुडदुडां पुढें पळतु ।धरितां तो न कळें मातु । वेदशास्त्रीं जया ॥१॥ तो बाळरुपें नंदाघरीं । खेळ खेळे नानापरी । न कळे लाघव निर्धारी । इंद्रादिकां गे माय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बाळ सगुण गुणाचें तान्हें गे । बाळ दिसतें गोजिरवाणें गे । काय सांगतां गार्‍हाणें गे । गोकुळींच्या नारी ॥१॥ श्रीरंग माझा वेडा गे । याला नाहीं दुसरा जोडा गे ।

रचनाकार: संत नामदेव

बाळका स्तनपान करविते माता । टाळितां परता चरणीं लोळे ॥१॥ हातीं घेऊनि शिपटीं माय लागे पाठीं । चरणीं घाली मिठी परते नोहें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बाळकाच्या बोला राजा भांबावला । म्हणे झालें याला ज्ञानगम्य ॥१॥ शांती याचे अंगीं बाणलीसे नीट । तेणें नेटेपाटे पुढारला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव