भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाळ सगुण गुणाचें तान्हें गे । बाळ दिसतें गोजिरवाणें गे । काय सांगतां गार्‍हाणें गे । गोकुळींच्या नारी

bal sagun gunachen tanhen ge | bal disaten gojiravanen ge | kay sangatan gar‍hanen ge | gokulinchya nari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बाळ सगुण गुणाचें तान्हें गे । बाळ दिसतें गोजिरवाणें गे । काय सांगतां गार्‍हाणें गे । गोकुळींच्या नारी ॥१॥ श्रीरंग माझा वेडा गे । याला नाहीं दुसरा जोडा गे । तुम्ही याची संगत सोडा गे । गोकुळींच्या नारी ॥२॥ पांच वर्षाचें माम्हेंफ़ बाळ गे । अंगणीं माझ्या खेळे गे । कां लटकाच घेतां आळ गे । गोकुळीच्या नारी ॥३॥ सांवळागे चिमणा माझा । गवळणींत खेळे राजा । तुम्ही मोठया ढालगजा गे । गोकुळींच्या नारी ॥४॥ तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा । आळ घेतां या गोपाळा गे । तुम्ही ठाईंच्या वोढाळागे । गोकुळींच्या नारी ॥५॥ तुम्हीं लपवुनी याची गोटी गे । लागतां गे याचे पाठीं गे । ही एकढीच रीत खोटीगे । गोकुळींच्या नारी ॥६॥ तुम्ही लपवून याचा भवरा गे । धरूं पाहतां सारंगधरा । तुम्ही बारा घरच्या बारागे । गोकुळींच्या नारी ॥७॥ हा ब्रम्हाविधीचा जनीता गे । तुम्हीं याला धरूं पाहतांगे । हा कैसा येईल हातां गे । गोकुळींच्या नारी ॥८॥ नामा म्हणे यशोदेसी गे । हा तुझा ह्रषिकेशी गे । किती छळितो आम्हासी गे । गोकुळींच्या नारी ॥९॥