भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाराही सोळा गडियांचा मेळा । सतरावा बसवंत खेळिया रे

barahi sola gadiyancha mela | satarava basavant kheliya re

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बाराही सोळा गडियांचा मेळा । सतरावा बसवंत खेळिया रे । जतिस पद राखों जेणें टिपरिया घाई । अनुहातें वायें मांदळा रे ॥१॥ नाचत पंढरिये जाऊं रे खेळिया । विठ्ठल रखुमाई पाहूं रे ॥ध्रु.॥ सा चहूं वेगळा अठराही निराळा । गाऊं वाजवूं एक चाळा रे । विसरती पक्षी चारा नेणें पाणी । तारुण्य देहभाव बाळा रे ॥२॥ आनंद तेथिचा मुकियासि वाचा । बहिरे ऐकती कानीं रे । आंधळ्यासि डोळे पांगुळांसि पाय । तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे ॥३॥