भजनी मालिका
← भजनांकडे परत

बारा हात लुगडें एकचि नारी । पालऊं घातला खांदियावरी

bara hat lugaden ekachi nari | palaun ghatala khandiyavari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बारा हात लुगडें एकचि नारी । पालऊं घातला खांदियावरी ॥१॥ जाईन त्या गोकुळा पाहीन त्या गोपाळा । तयालागीं उतावेळ मन माझें ॥२॥ एका हातीं घातला तांबियाचा वाळा । हाळदुळी वांटुनी सुद्लें मी डोळां ॥३॥ एकली जातां नोळखे मातें । विष्णुदास नाम्यास नेईन संगातें ॥४॥