भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाळ मातेपाशीं सांगे तानभूक । उपायाचें दुःख काय जाणे

bal matepashin sange tanabhuk | upayachen duhkh kay jane

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बाळ मातेपाशीं सांगे तानभूक । उपायाचें दुःख काय जाणे ॥१॥ तयापरी करीं पाळण हें माझें । घेउनियां ओझें सकळ भार ॥ध्रु.॥ कासया गुणदोष आणिसील मना । सर्व नारायणा अपराधी ॥२॥ सेवाहीन दीन पातकांची रासी । आतां विचारिसी काय ऐसें ॥३॥ जेणें काळें पायीं अनुसरलें चित्त । निर्धार हें हित जालें ऐसें ॥४॥ तुका म्हणे तुम्ही तारिलें बहुतां । माझी कांहीं चिंता असों द्यावी ॥५॥