भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाळ बापा म्हणे काका । तरी तो कां निपराध परिखा

bal bapa mhane kaka | tari to kan niparadh parikha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बाळ बापा म्हणे काका । तरी तो कां निपराध परिखा ॥१॥ जैसा तैसा भाव गोड । पुरवी कोड विठ्ठल ॥ध्रु.॥ साकरेसि म्हणतां धोंडा । तरी कां तोंडा न रुचे ॥२॥ तुका म्हणे आरुष बोल । नव्हे फोल आहाच ॥३॥