भजनी मालिका

भजने

बहुत जन्माशेवटीं तुजशीं जाली भेटी । बहु मी हिंपुटी जालों थोर ॥१॥ बहु कीर्ति ऐकिली बहुतांचे मुखीं । बहुत केले सुखी शरणागत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बहुत जन्में विरहें पीडली । नेणो कैसी स्थिर राहिली । मन अशा गोविंदी वेधिली । तो मध्यमा वैखारीये गुंतलो वो ॥१॥ चारी वाचा परता सावळां । विरहिनीसी छंद लागला । चौपरता कोठें गुंतला । तेंणों आम्हीं अबला वो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बहुत जाचलों संसारीं । वसें गभाअ मातेच्या उदरीं । लक्ष चौ†याशी योनिद्वारीं । झालों भिकारी याचक ॥१॥ जिणें पराधीन आणिकां हातीं । दृढ पाशीं बांधलों संचितीं । प्रारब्ध क्रियमाण सांगाती । भोवंडिती सत्ता आपुलिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बहुत तीर्थ क्षेत्रें बहुतापरी । न पावती सरी पंढरीची ॥१॥ वाहे दक्षिणभाग भीमा । पैल परमात्मा विटेवरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बहुत दाविती खुणा । आमुच्या नये त्या मना । आजी आला पाहुणा । गुरुराव ॥१॥ सांगे बोधाचिया गोष्टी । म्हणे का रें होतां कष्टी । या संसाराची तुटी । करा करा लवलाहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बहुत दिवस भरले पैं गोपाळा । अगा ये विठ्ठला कवण न ये ।।१।। नामा माझा वेग देई माझ्या हाती जाऊं दे परती अनाथनाथा ॥२॥

रचनाकार: संत गोणाई

बहुत दिवस भरले पैं गोपाळा । अगा ये विठ्ठला कवण न ये ॥१॥ नामा माझा वेगीं देई माझ्या हातीं । जाऊं दे परती अनाथनाथा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बहुत पुराणें बहुत मतांतरें । तयांच्या आदरें बोल नोहे ॥१॥ शाब्दिक संवाद नोहे हा विवाद । सबाह्म परमानंद हृदयामाजीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बहुत प्रकार बहुत या जगाचे । काय वानूं त्याचे गुणदोष ॥१॥ नीच हे याति अनामिक नांव । तेथें भावाभाव कोण कैचा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

बहुत प्रकारें भक्तहि असती । देवहि भेटती तयां तैसे ॥१॥ तैसा नोहे माझा पंढरीचा राव । देवाधिदेव मुकुटमणी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बहुत मारग बहुत प्रकार । नागवले थोर थोर मागें ॥१॥ म्हणोनियां जीवें मानिला विश्वास । नाहीं दुजीं आस संताविण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बहुत विचार करीत मानसीं । काय प्रारब्धासी करील कृष्ण ॥१॥ आम्हांसी तो पूर्ण दरिद्र भोगणें । तेथें नारायणें काय कीजे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बहुत सोसिले मागें न कळतां । पुढती काय आतां अंध व्हावें ॥१॥ एकाचिये अंगीं हें ठेवावें लावून । नये भिन्ना भिन्न चांचपडो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बहुत हिंडलो देश देशांतर । परी मन नाहीं स्थिर झालें कोठें ॥१॥ बहुत तीर्थें फिरोनियां आलों । मनासवें झालों वेडगळची ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

बहुता करूनि चाळवाचाळवी । किती तुम्ही गोवी करीतसां ॥१॥ लागटपणें मी आलों येथवरी । चाड ते दुसरी न धरूनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बहुतां छंदाचें बहु वसे जन । नये वांटूं मन त्यांच्या संगें ॥१॥ करावा जतन आपुला विश्वास । अंगा आला रस आवडीचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बहुतां जन्मां अंतीं जन्मलासी नरा । देव तूं सोइरा करीं आतां ॥१॥ करीं आतां बापा स्वहिताचा स्वार्थ । अनर्थाचा अर्थ सांडीं परतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम