भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुत दिवस भरले पैं गोपाळा । अगा ये विठ्ठला कवण न ये

bahut divas bharale pain gopala | aga ye viththala kavan na ye

रचनाकार: संत गोणाई · अभंग
बहुत दिवस भरले पैं गोपाळा । अगा ये विठ्ठला कवण न ये ।।१।। नामा माझा वेग देई माझ्या हाती जाऊं दे परती अनाथनाथा ॥२॥ खाऊं जेऊं तुज असोस पैं देऊं । कीर्ति तुझी गाऊं जगामाजीं ॥३॥ तुम काय जाणें ब्रह्मांडनायका नव्हेसी मजसारिखा एकदेशी ।।४।। अनंत ब्रह्मांडें क्षणें घडामोडीसी कां मज दुर्बळीसी कष्टाविलें ।।५।। तुज दुजेपणाचा सहज आला वीट। तूं तंव एकट एकलाची।।६।। ऐसी कीर्ति वेद वर्णिती पुराणें । तें कां लाजिरवाणें करिसी देवा ||७|| तूं कृपेचा कोंवळा म्हणति विश्वजन । त्या तुझें निर्वाण कळलें नाहीं ॥ ८ ॥ मैंद मुद्रा धरणें गळां तुळसीमाळा । निवटितोसि गळा न कळतां ।।९।। आतां आपुला भ्रमु राखे तो शहाणा झर्णे माझ्या निर्वाणा पहासी देवा ।। १० ।। गोणाई म्हणे माझा नामा देऊनी हातीं । अंगिकारी कीर्ति पंढरिराया ।। ११ ।।