भजनी मालिका
← भजनांकडे परत

कापड घेऊनी जाय बाजारासी गोणाई नाम्यासी शिकवितसे

kapad gheuni jay bajarasi gonai namyasi shikavitase

रचनाकार: संत गोणाई · अभंग
कापड घेऊनी जाय बाजारासी गोणाई नाम्यासी शिकवितसे ||१|| लोकांचे हे पुत्र संसार करिती। आमुची फजिती केली नाम्या ||२|| नाम्या विठोबाचा संग नव्हे बरा गेंद हा खरा गलाकाटू ||३|| याचे संगतीनें संसार जाळाया भोपळा हा घ्यावा भीक मागूं ||४|| नको संग धरूं नाम्या ऐक गोष्टी । गोणाई. हनुवटी धरूनी सांगे ॥५॥