भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुत सोसिले मागें न कळतां । पुढती काय आतां अंध व्हावें

bahut sosile magen na kalatan | pudhati kay atan andh vhaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहुत सोसिले मागें न कळतां । पुढती काय आतां अंध व्हावें ॥१॥ एकाचिये अंगीं हें ठेवावें लावून । नये भिन्ना भिन्न चांचपडो ॥ध्रु.॥ कोण होईल तो ब्रम्हांडचाळक । आपणें चि हाके देईल हाके ॥२॥ तुका म्हणे दिलीं चेतवूनि सुणीं । कौतुकावांचूनि नाहीं छळ ॥३॥