भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुत जन्माशेवटीं तुजशीं जाली भेटी । बहु मी हिंपुटी जालों थोर

bahut janmashevatin tujashin jali bheti | bahu mi himputi jalon thor

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बहुत जन्माशेवटीं तुजशीं जाली भेटी । बहु मी हिंपुटी जालों थोर ॥१॥ बहु कीर्ति ऐकिली बहुतांचे मुखीं । बहुत केले सुखी शरणागत ॥२॥ बहुतां आसक्त बहुतां ओळगणा । बहुत विटंबना जाली माझी ॥३॥ बहु फेरे पाहिले बहु दुःख साहिलें । बहु चित्त वाहिलें दुर्भरची ॥४॥ बहुत काळ गेले बहु अन्याय केले । बहु नाहीं जोडिलें नाम तुझें ॥५॥ नामा म्हणे केशवा एक उरली वासना । घ्यावी नारायणा चरणसेवा ॥६॥