भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुत विचार करीत मानसीं । काय प्रारब्धासी करील कृष्ण

bahut vichar karit manasin | kay prarabdhasi karil krushna

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बहुत विचार करीत मानसीं । काय प्रारब्धासी करील कृष्ण ॥१॥ आम्हांसी तो पूर्ण दरिद्र भोगणें । तेथें नारायणें काय कीजे ॥२॥ एका जनार्दनीं करीत विचार । चालिला सत्वत ग्रामपंथे ॥३॥