भजनी मालिका

भजने

पिंडदान पिंडें ठेविलें करून । तिळीं तिळवण मूळत्रयीं ॥१॥ सारिले संकल्प एका चि वचनें । ब्रह्मीं ब्रह्मपण सेवटींच्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पिंडपोशकाच्या जळो ज्ञानगोष्टी । झणी दृष्टिभेटी न हो त्याची ॥१॥ नाहीं संतचिन्ह उमटलें अंगीं । उपदेशालागीं पात्र झाला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पिंडिच्या प्रळयासी सांगेन तुम्हांसी जो कां या देहासी होत आहे. ॥१॥ पृथ्वी बोलिजे प्राणी प्राणरंध्र । परिमळ घेउनी जाये तें घर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा । हरिविण सारा व्यर्थ भ्रम ॥१॥ शुक याज्ञावल्क्या दत्त कपिल मुनी । हरीसी जाणोनी हरिच झाले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पितयाची भक्ति पुंडलीकें केली । मात हे ऐकिली देव-रायें ॥१॥ नवलक्ष गोधनें पांचसें सवंगडे । रामकृष्ण पुढें चालताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पिता पुत्र नातु सर्व काळें ग्रासिलें । उरले ते गेले काळमुखीं ॥१॥ सायास करूनि वाढविती माझें । परि काळाचें तें खाजें नेणती ते ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पिता शिकवी पुत्रासी । नको जाऊं बापा हरिकथेसि । तेथें पांचा तोंडांची विवशी । ते वैष्णवें आणिली आहे ॥१॥ तिचिया गळां रुंडमाळा । अंगीं स्मशानींचा उधळा । कंठीं सर्पाचें हळाहळ । गजचर्म पांघुरलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पितृभजन जरी पुंडलिक न करिता । तरी कां हां झोंड येता पंढरीसी ॥१॥ वेव्हार करितां आम्हासी जिंकिलें । जन्ममरण केलें देशधडी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पित्याचिये काजा देह हें वेंचावें । तेव्हांची बरवें दिसे लोकीं ॥१॥ सरसावला पुत्र म्हणे मातेप्रती । वांचवीं भूपती सत्वा हातीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पिसाळलें श्वान पाणीयासी बीहे । तैसा नरदेह संसारासी ॥१॥ वाउगाची शीण पावती पतन । नेणे आपुलें विंदान भुलला वायां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ