भजनी मालिका
← भजनांकडे परत

पित्याचिये काजा देह हें वेंचावें । तेव्हांची बरवें दिसे लोकीं

pityachiye kaja deh hen venchaven | tevhanchi baraven dise lokin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पित्याचिये काजा देह हें वेंचावें । तेव्हांची बरवें दिसे लोकीं ॥१॥ सरसावला पुत्र म्हणे मातेप्रती । वांचवीं भूपती सत्वा हातीं ॥२॥ तोषेल श्रीपती मज ऎसे किती । पुत्र तुम्हां होती सत्वधीर ॥३॥ एका जनार्दनी सत्वाचा आगळा । प्रिय तो गोपाळ तोचि एक ॥४॥