भजनी मालिका
← भजनांकडे परत

पिसाळलें श्वान पाणीयासी बीहे । तैसा नरदेह संसारासी

pisalalen shvan paniyasi bihe | taisa naradeh sansarasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पिसाळलें श्वान पाणीयासी बीहे । तैसा नरदेह संसारासी ॥१॥ वाउगाची शीण पावती पतन । नेणे आपुलें विंदान भुलला वायां ॥२॥ मर्कटासो जेवीं मदिरा पाजिली । भूतबाधा झाली तयावरी ॥३॥ सैरावैरा नाचे कोण तया हासे । एका जनार्दनीं तैसें मनुष्यदेहीं ॥४॥