भजनी मालिका
← भजनांकडे परत

पिता पुत्र नातु सर्व काळें ग्रासिलें । उरले ते गेले काळमुखीं

pita putra natu sarva kalen grasilen | urale te gele kalamukhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पिता पुत्र नातु सर्व काळें ग्रासिलें । उरले ते गेले काळमुखीं ॥१॥ सायास करूनि वाढविती माझें । परि काळाचें तें खाजें नेणती ते ॥२॥ बाळतरुण वृद्धदशातें पावती । परी न म्हणती रामराम ॥३॥ एका जनार्दनीं भुलला गव्हार । न करी स्वहिताचा ॥४॥