भजनी मालिका

भजने

परियेसी रुक्माई जैसा बैसला पार्टी दैन्य पैं न सोडी काय करूं।।१।। सदैवाच्या खिया अलंकारमंडित। मजवरी नाहीं प्रीत काय करूं।।२।।

रचनाकार: संत राजाई

परियेसी वासने संकल्प स्वरूपे । विश्वव त्वां आटोपें वश केलें ॥१॥ ब्रह्मादिक तुझे इच्छेचें खेळणें । विषयाकारणें लोलिंगता ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

परिस काय धातु सोने न करीतु । फेडितो निभ्रांतु लोहपांगु ॥१॥ काय तयाहूनि जालासी बापुडें । फेडितां सांकडें माझे एक ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परिसा भागवत करितसे शोक । म्हणती देवा दुःख अति जालें ॥१॥ द्वादशी समाधि दिधली निवृत्तीसी । जाले उदासी अवघेजणा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

परिसाचे अंगें सोनें जाला विळा । वाकणें या कळा हीन नेव्हे ॥१॥ अंतरीं पालट घडला कारण । मग समाधान तें चि गोड ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परिसुनी ते गोष्टी घाली चरणीं मिठी । दाटलासे कंठीं सद्‌गदित ॥१॥ कृपेचें पोसणें मी पंढरीरायाचें । येवढें भाग्य कैचें मज जाणिवेचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

परिसें वो माते माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ भागीरथी महादोष निवारणी । सकळां स्वामिणी तीर्थांचिये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परी तें कर्म बळोत्तर । नेदी राहों वृत्ति स्थिर । झोंबोनियां विखार । आणिला ओढोनि लोभावरी ॥१॥ मग म्हणे वो सुंदर बाळ । यशोदे नागर हें वेल्हाळ । परि याचा जन्मकाळ । कैसा असेल पाहों तों ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

परीक्षिती राया सांगतसे शुक । वैकुंठनायक रांगतसे ॥१॥ दुडदुडा पळती मुखीं लावी माती । शेणांत लोळती दोघे-जण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

परेंचें जें सुख पश्यंती भोगी । तोचि राजयोगी मुकुटमणी ॥१॥ सिद्धाची ही खुन साधक सुख जाण । सदगुरुसी शरण रिघोनिया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

परेसी न कळे पार । पश्यंतीसी निर्धार । मध्यमा तो स्थिर वैखरीये ॥१॥ चहुं वाचा कुंठीत । ऐसें नाम समर्थ । आम्ही गाऊं सदोदित । सोपें नाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

परेहुनि परता वैखरिये कानडा । विठ्ठल उघडा भीतातटीं ॥१॥ शिणली दरुशनें भागली पुराणें । शास्त्राचियें अनुमानें न ये दृष्टी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ