भजनी मालिका
← भजनांकडे परत

परिसा भागवत करितसे शोक । म्हणती देवा दुःख अति जालें

parisa bhagavat karitase shok | mhanati deva duhkh ati jalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
परिसा भागवत करितसे शोक । म्हणती देवा दुःख अति जालें ॥१॥ द्वादशी समाधि दिधली निवृत्तीसी । जाले उदासी अवघेजणा ॥२॥ देव म्हणे उठा करा आतां पूजा । घालूं पुष्णशेजा समाधीसी ॥३॥ उठले सकळ होताती विकळ । गेले ते गोपाळ समाधीसी ॥४॥ घेतली समाधि सव्य वैष्णवांनीं । पूजिताती सुमनीं समाधीसी ॥५॥ नामा म्हणे अवघे करा प्रदक्षिणा । चला आचामना पुष्कर्णीसी ॥६॥