भजनी मालिका
← भजनांकडे परत

परी तें कर्म बळोत्तर । नेदी राहों वृत्ति स्थिर । झोंबोनियां विखार । आणिला ओढोनि लोभावरी

pari ten karma balottar | nedi rahon vrutti sthir | jhomboniyan vikhar | anila odhoni lobhavari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
परी तें कर्म बळोत्तर । नेदी राहों वृत्ति स्थिर । झोंबोनियां विखार । आणिला ओढोनि लोभावरी ॥१॥ मग म्हणे वो सुंदर बाळ । यशोदे नागर हें वेल्हाळ । परि याचा जन्मकाळ । कैसा असेल पाहों तों ॥२॥ कृष्णपक्ष श्रावण मास । रोहिणी नक्षत्र अष्टमी दिवस । मध्यरात्रीचा जन्म यास । दशा तों क्रूर दिसताहें ॥३॥ जन्मकाळीं सर बारावा गुरु । शनी भोग हानिस्थानी स्थिरु । राहो केतु आणि दिनकरु । देशत्यागातें सुचिती ॥४॥ याचेन सकल वंश हानि । करील कुळाची बुडवणी । नये अवलोकु यातें नयनीं । टाकावा नेऊनि अरण्यात ॥५॥ यशोदे न लावी यासी उशीर । बाळ नव्हे हा मायावी खेचर । कालचि पाहेपां केला संहार । पेतनेचा क्षणही न लागतां ॥६॥ निळा म्हणे ऐकोनि ऐंसे । मोडलें विंदान परमपुरुषे । जयाचें कर्म देखिलें जैसे । दिल्हे तया तैसे दानफळ ॥७॥