भजनी मालिका
← भजनांकडे परत

परेंसि परतें स्वरुप या हरिचे

parensi paraten svarup ya hariche

परेंसि परतें स्वरुप या हरिचे । भक्तिमार्ग साचे विरुढे रुप ॥१॥ चला जाऊं पाहूं आत्मराज घटीं । नामें नेतु तटीं वैकुंठीचिया ॥२॥ समाधि विधान हरिपाठगुण । उगीयाचि मौन असिजे रया ॥३॥ ज्ञानदेव निवृत्ति पुसों जाये भाव । तंव तेणें स्वयमेंव दाविले डोळा ॥४॥