भजनी मालिका

संत राजाई

या संतांची भजने

अंगोळिये विठा कडियेसी नारा। राजाई पंढरपुरा चालिबेली।।१।। भिवरा संपूर्ण जातसे भरवेली। राजाई बोलली कैसें जालें ॥२॥

रचनाकार: संत राजाई

आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका नाहीं भय शंका लौकिकाची।।१।। लाखोनि लंगोटी जाती गोसावी आमुची उठाठेवी कोण करी ||२||

रचनाकार: संत राजाई

ऐसी चिंताक्रांत मनीं दुःख धरिलें । म्हणे कां बायें दिधलें ऐशियासी ।।१।। खाया ना जेवाया लेया ना नेसाया। दैन्य भोगावया आलें जन्मा ||२||

रचनाकार: संत राजाई

घरधनि याण केला गुरू। बाई मी आतां काय करूं। असोनि नाहींसा संसारू। चमत्कार कृपेचा || १ || धांवे पावे गे मेसाई येथें कोणाचें न चाले कांहीं। सत्यपण तुझे ठायीं तरी हैं नाहिसें करी गे ||२||

रचनाकार: संत राजाई

दोन प्रहर रात्र पाहोनी एकांत राजाई वृत्तांत सांगे माते ।।१।। अहो रखुमाबाई विठोबासि सांगा अतारासि कां गा वेडें केलें ॥२॥

रचनाकार: संत राजाई

नामदेवा घरी पाहुणे मेहुणे आले दोघेजण पंढरिसी ।।१।। राजा बंधु देखुनि दृष्टिसी उल्हास मानसी थोर जाला ॥२॥

रचनाकार: संत राजाई

परियेसी रुक्माई जैसा बैसला पार्टी दैन्य पैं न सोडी काय करूं।।१।। सदैवाच्या खिया अलंकारमंडित। मजवरी नाहीं प्रीत काय करूं।।२।।

रचनाकार: संत राजाई

राजाई तें पुसे अहो नामयाला करा जेवायला कांही यासीं ।। १ ।। प्रातःकाळी घरी सारूनि भोजन । आले ते चालून माझे भेटी ॥२॥

रचनाकार: संत राजाई

शिकवा हो रुक्माई आपुलिया कांता । कां आम्हां अनाथा कष्टवितो ||१|| न्मोनियां आमुची पुरविली पाटी मोडिली राहाटी संसाराची ॥२॥

रचनाकार: संत राजाई

सावध सावध राजाई हो सुखें नामयानें दुःख निरसिलें ||१|| संसार सांतें या येऊनि भाग्याचा छंद विठ्ठलाचा लागला यासी।।२।।

रचनाकार: संत राजाई