भजनी मालिका
← भजनांकडे परत

सावध सावध राजाई हो सुखें नामयानें दुःख निरसिलें

savadh savadh rajai ho sukhen namayanen duhkh nirasilen

रचनाकार: संत राजाई · अभंग
सावध सावध राजाई हो सुखें नामयानें दुःख निरसिलें ||१|| संसार सांतें या येऊनि भाग्याचा छंद विठ्ठलाचा लागला यासी।।२।। याचें नाम ऐसें न दिसे त्रिभुवनीं नायकों दुर्जे कर्णी नाम्या ऐसें ||३|| वैष्णवांचे गजर टाळघोष दिंडी । उभयतां ब्रह्मांडीं घोष गेला ||४|| तयाच्या दर्शने कलिमाजीं तारिलीं । भाग्यें विनटलीं विठ्ठलेंसी।।५॥ राजाई म्हणे माते रखुमाई बुद्धिवंते आमुच्या अदृष्टार्ते लिहिलें कैसें ॥६॥