भजनी मालिका
← भजनांकडे परत

दोन प्रहर रात्र पाहोनी एकांत राजाई वृत्तांत सांगे माते

don prahar ratra pahoni ekant rajai vruttant sange mate

रचनाकार: संत राजाई · अभंग
दोन प्रहर रात्र पाहोनी एकांत राजाई वृत्तांत सांगे माते ।।१।। अहो रखुमाबाई विठोबासि सांगा अतारासि कां गा वेडें केलें ॥२॥ स्त्र पात्र नाहीं खाया जेवयासी । नाचे अहर्निशीं निर्लज्जसा ।।३।। चवदा मनुष्ये आहेत माझ्या घरी हिंडती दारोदारी अन्नासाठीं ॥४॥ बरा मार्ग तुम्ही उमजोनि सांगा नामयाचीराजा भली नव्हे ॥५॥