भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंगोळिये विठा कडियेसी नारा। राजाई पंढरपुरा चालिबेली

angoliye vitha kadiyesi nara| rajai pandharapura chalibeli

रचनाकार: संत राजाई · अभंग
अंगोळिये विठा कडियेसी नारा। राजाई पंढरपुरा चालिबेली।।१।। भिवरा संपूर्ण जातसे भरवेली। राजाई बोलली कैसें जालें ॥२॥ एकली मी बाळें काय करूं आतां। आहा पंढरिनाथा काय केलें ॥३॥ एक बांधिलें पाठीसी दुजें बांधिलें पोटासी। वेणुनादापाशीं वाहावत गेली ||४|| हंबरडा हाणोनि बोभाये नामया। आवर्ती पडोनियां तळास गेली ।।५॥ योगनिद्रा सारोनि देव जागा जाला । त्वरित पावला काढिली तियें।।६।। नारा विठा दोघे कडियेसी घेतले। राजाईस धरिलें दक्षिण करीं ||७|| आणिलीं महाद्वारा पुढे दे लेकुरा । विठोबा सामोरा नामा आला ||८|| बाबा बाबा म्हणोनि नारा धाविनला नामा त्या बोलिला परतें होई।।९।। देखोनि राजाईसी गहिंवरू पैं आला। अरे बा विठ्ठला काय केलें ।।१०।। वाळेसहित विख घेईन मी आतां पाहे पंढरिनाथा बुडवीन घर।।११।। मेला सर्प होतां तो ओटिये घेतला खांडोनि घातला डेन्यामाजीं ।। १२ ।। खाली ज्वाळ पाली उकळी फुटली पोटासी धरिली दोघे बाहें ॥१३॥ देह विठोबासी समर्पण करूं। ऐसा पॅ निर्धारूं धरियेला ||१४|| रुक्मिणी म्हणे देवा अनर्थ मांडिला । नामा बाहेर गेला निश्चयेंसी ।।१५।। डेरा उघडोनि राजाई जंब पाहे । तोंडभरी भरलाहे अवर्षे सोनें ॥१६॥ राजाईनें धरिले नामयाचे चरण । कृपादृष्टी पाहणें आम्हांकडे ||१७|| विठ्ठल विठ्ठल ऐसें बोलियेला निवांत राहिला घटका चारी ।।१८।। कांपत कांपत महाद्वारी आला तुझी माव विठ्ठला नकळे कांहीं ||१९|| अष्ट दिशा देवा वरुता आणि खालुता । तुजविण सर्वथा ठाव नाहीं ॥२०॥ तंव नामदेव निजला देखिला। अंतरीं उठिला विठ्ठल ध्वनी ।। २१ ।। राजाई म्हणे प्रयत्न न चले तेथे आतां । प्रार्थं पंढरिनाथा बहुतांपरी ।।२२।। राजाईनें धरिले विठोबाचे पाय । कृपादृष्टि पाहे आम्हांकडे ।। २३॥