भजनी मालिका
← भजनांकडे परत

परेसी न कळे पार । पश्यंतीसी निर्धार । मध्यमा तो स्थिर वैखरीये

paresi na kale par | pashyantisi nirdhar | madhyama to sthir vaikhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
परेसी न कळे पार । पश्यंतीसी निर्धार । मध्यमा तो स्थिर वैखरीये ॥१॥ चहुं वाचा कुंठीत । ऐसें नाम समर्थ । आम्ही गाऊं सदोदित । सोपें नाम ॥२॥ ऋद्धिसिद्धि धांवे पायीं । मुक्तिसे तो अवसर नाहीं । मुक्तीचा तो उपाय काहीं । हरिदास ॥३॥ एका जनार्दनीं भाव । भावंचि तुष्टे देव । आणीक नको उपाव । नाम स्मरे ॥४॥