भजनी मालिका

भजने

पतित मीराशी शरण आलों तुज । राखें माझी लाज पांडुरंगा ॥१॥ तारियेले भक्ती न कळे तुझा अंत । थोर मी पतित पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पतितपावन नाम श्रीविठ्ठलाचें । आणिक मी साचें नेणें कांहीं ॥१॥ पतितपावन नाम वाणी । विठ्ठलांवांचुनी कांहीं नेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पतितपावना धांवसी निर्वाणीं । ब्रीद चक्रपाणि सत्य केलें ॥१॥ काय अपराध कोणाचे पाहिले । नाहीं तुवां त्यागिलें नष्टखळां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पतिव्रता ऐसी जगामध्यें मात । भोगी पांच सात अंधारीं ते ॥१॥ भ्रतारासी लेखी श्वानाचे समान । परपुरुषीं मन संभ्रम तो ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

पतिव्रता नेणे आणिकांची स्तुती । सर्वभावें पति ध्यानीं मनीं ॥१॥ तैसें माझें मन एकविध जालें । नावडे विठ्ठलेंविण दुजें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पतिव्रता सती उठोनि सकाळीं । शेजारिणी सदनीं येती जाहली ॥१॥ अहो माते पती जाती कृष्ण दरुशना । कांही तरी धान्य देईं मज ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पतिव्रते आनंद मनीं । सिंदळ खोंचे व्यभिचारवचनीं ॥१॥ जळो वर्म लागो आगी । शुद्धपण भलें जगीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम