भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतित मीराशी शरण आलों तुज । राखें माझी लाज पांडुरंगा

patit mirashi sharan alon tuj | rakhen majhi laj panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पतित मीराशी शरण आलों तुज । राखें माझी लाज पांडुरंगा ॥१॥ तारियेले भक्ती न कळे तुझा अंत । थोर मी पतित पांडुरंगा ॥ध्रु.॥ द्रौपदी बहिणी वैरीं गांजियेली । आपणाऐसी केली पांडुरंगा ॥२॥ प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार । माझा कां विसर पांडुरंगा ॥३॥ सुदामा ब्राम्हण दारिद्रें पीडिला । आपणाऐसा केला पांडुरंगा ॥४॥ तुका म्हणे तुज शरण निजभावें । पाप निदाऩळावें पांडुरंगा ॥५॥