भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतिव्रता नेणे आणिकांची स्तुती । सर्वभावें पति ध्यानीं मनीं

pativrata nene anikanchi stuti | sarvabhaven pati dhyanin manin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पतिव्रता नेणे आणिकांची स्तुती । सर्वभावें पति ध्यानीं मनीं ॥१॥ तैसें माझें मन एकविध जालें । नावडे विठ्ठलेंविण दुजें ॥ध्रु.॥ सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा । गाय ते कोकिळा वसंतेंसी ॥२॥ तुका म्हणे बाळ मातेपुढें नाचे । बोल आणिकांचे नावडती ॥३॥