भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतिव्रता ऐसी जगामध्यें मात । भोगी पांच सात अंधारीं ते

pativrata aisi jagamadhyen mat | bhogi panch sat andharin te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पतिव्रता ऐसी जगामध्यें मात । भोगी पांच सात अंधारीं ते ॥१॥ भ्रतारासी लेखी श्वानाचे समान । परपुरुषीं मन संभ्रम तो ॥२॥ तुका म्हणे तिच्या दोषा नाहीं पार । भोगील अघोर कुंभपाक ॥३॥