भजनी मालिका

भजने

नाहीं वारी पळमात्र घडी । गेले कल्पकोडी यांचिपरि ॥१॥ आतां कधीं मोकळा होसी । मग या पावसी परमार्था ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नाहीं विश्वास जया गाठीं । न पाहती दिठीं पंढरी ते ॥१॥ अदृष्ट त्यांचे हीन झालें । न देखती पाउलें विटेवरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नाही शब्दाधीन वर्म आहे दुरी । नव्हे तंत्रमंत्रीं अनुभव तो ॥१॥ हर्षामर्ष आंगीं आंदोलती लाटा । कामक्रोधे तटा सांडीयले ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नाहीं संदेह करी हा पाठ । पावसी वैकुंठ हरि म्हणतां ॥१॥ जैसे प्रल्हाद उपमन्यु धुरु । करितां नामोच्चारु वरिष्ठ पदीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नाहींचि केलें समाधान । माझें म्हणवून क्षिती वाटे ॥१॥ आतां कधीं समोखाल । हातीं धरा प्रीतीनें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नाहींचि तुम्हां भीडचाड । येथें करुं अल्याति बडबड । कृष्ण माझा अवघ्यांसीं गोड । तुम्हांसी कां गे वीट याचा ॥१॥ जाऊं नेणेचि बाहेरी । तयावरी घालितां गे तुम्ही चोरी । आलगटा अवघ्याचि नारी । नसतींच गाहाणीं आणित्या ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नि:सीम भाव देखोनियां हरि । केली स्वीकारी पूजा त्याची ॥१॥ पत्र पुष्प तोय फल । घाली सकळ मुखींचि तें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा