भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं सायासाचें काम । वाचे वदा रामनाम

nahin sayasachen kam | vache vada ramanam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाहीं सायासाचें काम । वाचे वदा रामनाम ॥१॥ बहु कर्मा सोडवण । वाचेसि न घडे मौन ॥२॥ राम चिंता ध्यानीं मनीं । कळिकाळ वाहे पाणी ॥३॥ एका जनार्दनीं राम । वाचे उच्चारा निष्काम ॥४॥