भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं लौकिकासी काम । गाईन नाम सर्वदा

nahin laukikasi kam | gain nam sarvada

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाहीं लौकिकासी काम । गाईन नाम सर्वदा ॥१॥ हेंचि माझें भांडवल । विठ्ठल विठ्ठल खरें नाणे ॥२॥ नेघों भुक्ति नेघों मुक्ति । प्रेम विरक्ति हरिनामीं ॥३॥ निळा म्हणे साधन सार । तुमच्या उच्चार नामाचा ॥४॥