भजनी मालिका

भजने

न सुटेचि आशा गुंतें बळें पाशे । दुःखाचिया सरसें म्हणे देव ॥१॥ ऐसे अमंगळ गुंतले कर्दमीं । भोगिताती कर्मीं जन्मदशा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

न सोडी रे मना गुरुजनार्दना । संसार बंधना सोडविलें ॥१॥ संसार अजगर झोंबला विखार । धन्वंतरी थोर जनार्दन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

न सोदी रे मना गुरुजर्नादना । संसार बंधना सोडविलें ॥१॥ संसार अजगर झोंबला विखार । धन्वंतरी थोर जनार्दन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नका करुं वाद विवाद पसारा । वाउगा मातेरा नरदेहीं ॥१॥ आयुष्याचे अंतीं कामा नये कोणी । नेती ढकलुनी एकलेंचि ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नका पाहू माझे क्रियाआचरित । भक्त भागवत नव्हे ज्ञानी ॥१॥ आठवितां नाम नेणें दुजी परी । मी माझे श्रीहरि नाहीं गेलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नका बोलों शब्द वावगे विवाद । आठवा गोविंद ध्यानीं मनीं ॥१॥ सकळही तुमचें होईल कल्याण जरी गाल गाणें विठोबाचें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नका होऊं खेदक्षीण । घ्या भाष माझें बंधन । तुम्हां वांचूनियां मजही कोण । आहे तें आप्त इहलोकीं ॥१॥ जैसा तुमचा मजवरी भाव । माझीही तैसाची तुम्हांवरी जीव । नाही येथें संदेहा ॥ ठाव । चित्ताचित्त साक्ष असे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नको आणिकांच्या पडुं हावभरी । वांयां रानभरी कां रे रहाशीं ॥१॥ चुकवी पतन उच्चारीं तुं नाम । आणिक नको धाम यापरतें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नको करुं आतां कृष्णा तु खोडीं । नाहीं म्हणोनियां दोनी हात जोडी ॥१॥ काल इचे गृहीं थोडें खादले नववीत । म्हणोनि राधिकेचे स्तनी ठेवी हात ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नको करुं कर्माकर्म । तुम्हां सांगतों मी वर्म । श्रीरामाचें नाम । अट्टाहास्यें उच्चारा ॥१॥ तेणें तुटेल उपाधी । निरसेल भेदबुद्धी । होईल सत्वशुद्धी । भक्तिलागीं देवाच्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नको कर्म धर्म वार्ता । सुखें करा हरिकथा । भवजन्मव्यथा । येणें तुटे तुमची ॥१॥ सोपें साधनाचें सार । वाचे नरहरी उच्चारी । भयें चुके येरझार । चौर्‍यांशींची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नको गा मोकलूं दीना पंढरिनाथा । तुजविण आतां कोण पावे ॥१॥ अपराधाच्या पोटीं पाहूं नको कांहीं । ये गे विठाबाई झडकरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव