भजनी मालिका
← भजनांकडे परत

न होता शुद्ध अंतःकरण । संतसेवा न घडे जाण

na hota shuddha antahkaran | santaseva na ghade jan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
न होता शुद्ध अंतःकरण । संतसेवा न घडे जाण ॥१॥ शुद्ध संकल्पावांचुन । संतसेवा न घडेचि जाण ॥२॥ कामक्रोध दुराचार । यांचा करुं नये अंगिकार ॥३॥ आशा मनींशांचें जाळें । छेदुनीं टाकी विवेकबळें ॥४॥ एका जनार्दनीं ध्यान । सहज तेणें संतपण ॥५॥