भजनी मालिका
← भजनांकडे परत

नका होऊं खेदक्षीण । घ्या भाष माझें बंधन । तुम्हां वांचूनियां मजही कोण । आहे तें आप्त इहलोकीं

naka houn khedakshin | ghya bhash majhen bandhan | tumhan vanchuniyan majahi kon | ahe ten apta ihalokin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नका होऊं खेदक्षीण । घ्या भाष माझें बंधन । तुम्हां वांचूनियां मजही कोण । आहे तें आप्त इहलोकीं ॥१॥ जैसा तुमचा मजवरी भाव । माझीही तैसाची तुम्हांवरी जीव । नाही येथें संदेहा ॥ ठाव । चित्ताचित्त साक्ष असे ॥२॥ तुम्ही निरंतर मातेंचि ध्यातां । मीही न विसंबे तुम्हींची देखतां । ऐसें परस्परें बोलतां । लोटती उभयतां नेत्री पूर ॥३॥ वियोग न साहवें कृष्णासी । त्याही होती कासावीसी । परी धैर्याचिया अती आवेशीं । पुढील साधिती कार्यार्थू ॥४॥ भक्तकृपाळू श्रीहरी । अवघा प्रेमा भक्तांचि वरी । त्याचि कार्या अवतार धरी । न विसंबे क्षणभरी नव्हे परता ॥५॥ अनावरा आवरिलें जिहीं । जिव प्राण ठेवूनि पांई । हाही तयातें निज ह्रदयीं । सर्वकाळ आठवितु ॥६॥ निळा म्हणे संबोखिल्या । ऐसिया उत्तरीं स्थिराविल्या । मनोरथ करुनियां ठेविल्या । आपुलीये चिंतनीं सादर ॥७॥